आमच्याविषयी थोडक्यात!
ज्ञानालय प्रकाशन हे संशोधित, दर्जेदार, ज्ञानवर्धक आणि समाजप्रबोधक पुस्तकांच्या निर्मितीसाठी व नवलेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी कटिबद्ध आहे. ज्ञानालय प्रकाशनाचे प्रकाशक श्री. तुकाराम सोपान जंगले हे असून त्यांचे शिक्षण M.A. संस्कृत वेदांत, M.A. संस्कृत साहित्य, M.A. मराठी, B.Ed., M.Phil, NET, Ph.D संस्कृत (Pursuing) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे असे आहे. त्यांची “जीवन संस्कार” आणि “भारतीय शिक्षणशास्त्र” अशी दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. तसेच साधारणतः १० संशोधन लेख मान्यताप्राप्त शोधपत्रिकांमधून प्रकाशित झालेले आहेत. ज्ञानालय प्रकाशनाच्या माध्यमातून ई-पुस्तके आणि छापील पुस्तके वाचकांना dnyanalay.com या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.