प्राचीन गुरुकुल पद्धतीच्या रुपात उगम पावलेली भारतीय शिक्षणगंगा काळानुरूप विविध वळणे घेत मध्ययुगात संतांच्या लोकशिक्षणातून तळागाळातील जनमनापर्यंत पाझरली.
या भारतीयांच्या शैक्षणिक विकासाच्या वाटचालीचा इतिहास समजण्यासाठी प्राचीन व मध्ययुगीन शिक्षणाचा आढावा घेतांना अनेक नावीन्यपूर्ण पैलु आपल्यासमोर येणार आहेत. जसे की, प्राचीन गुरुकुलांची वर्णने, गुरु-शिष्यांचे भावनिक विश्व, शिष्याची दिनचर्या, गुरु-शिष्याचे पर्यावरणाशी नाते, अध्ययन-अध्यापन पद्धती, विद्वत्सभा आणि परिषदा, शिक्षणाची ध्येये व उहिष्ट्ये, संतांचे लोक-शिक्षण, सामाजिक जडणघडणीतील नीतिमूल्ये आणि भारूड किर्तनासारखी प्रभावी समाज प्रबोधनपद्धती.
आज आपण आधुनिक काळामध्ये वाटचाल करत असतांना प्राचीन व मध्ययुगीन शिक्षणाचा खरंच काय उपयोग आहे? गुरुकुल पद्धती आपल्याला आजही एवढी महत्त्वाची का वाटते? अथवा संतांनी लोकोद्धारासाठी काय कार्य केले होते?
तर सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी शिक्षण हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. वर्तमानातील बदलत्या काळामध्ये आधुनिक परिप्रेक्षातून गुरुकुल पद्धती, संतांचे लोकशिक्षण कसे उपयोगाचे ठरु शकते हे समजण्यासाठी प्रस्तुत ग्रंथ महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरणार आहे. आज आपण शिक्षणाच्या माध्यमातून केवळ बौध्दिक विकासावरच जास्त भर देतो व आत्मा, मन, प्राण आणि शरीराच्या विकासाकडे दुर्लक्ष करतो. अशावेळी शिक्षणातून सर्वागीण विकास होणे आवश्यक आहे.
मग तो भारतीय शिक्षणाच्या माध्यमातून कसा केला जाऊ शकतो यासाठीच हा ग्रंथप्रपंच !!!
Reviews
There are no reviews yet.